जनसेवेचा संकल्प — विकासाची नवी दिशा हाजी सलीम शेख फत्तू (हाजी शेखा मिस्त्री) — प्रभाग क्र. 13 ब (सर्वसाधारण) मधून अमळनेर नगरपरिषद निवडणूक 2025 साठी इच्छुक.

अमळनेर :—
अमळनेर नगरपरिषद निवडणूक 2025 च्या पार्श्वभूमीवर प्रभाग क्र. 13 ब (सर्वसाधारण) मधून हाजी सलीम शेख फत्तू (हाजी शेखा मिस्त्री) यांनी पुन्हा एकदा जनतेच्या सेवेसाठी उमेदवारीची इच्छा व्यक्त केली आहे.

हाजी शेखा यांनी त्यांच्या नगरसेवक पदाच्या कार्यकाळात भागातील सर्वांगीण विकासावर भर देत शादी हॉल बांधकाम, प्रत्येक गलीत पेवर ब्लॉक बसविणे, खरोट कब्रस्तान आणि वालकंपाऊंडचा विकास यांसारखी अनेक विकासकामे यशस्वीरीत्या पूर्ण केली आहेत.

त्यांच्या मनमिळाऊ स्वभावामुळे आणि सर्वसमावेशक दृष्टिकोनामुळे नागरिकांमध्ये त्यांचा विशेष सन्मान आहे. विधवा महिला, गरजू व वंचित घटकांना मदत करण्यासाठी ते सदैव तत्पर राहिले आहेत.

हाजी शेखा म्हणाले,

“माझ्या प्रभागातील नागरिकांनी मला सदैव विश्वास आणि प्रेम दिले आहे. पुन्हा एकदा संधी मिळाल्यास मी ही संधी जनतेच्या विकासासाठी अधिक जोमाने वापरेन.”

नागरिकांकडून त्यांच्या उमेदवारीला मोठा प्रतिसाद मिळत असून, जनतेचा विश्वास आणि आशीर्वाद त्यांच्यासोबत कायम राहील, असा विश्वास हाजी सलीम शेख फत्तू यांनी व्यक्त केला आहे.


आपलाच —
🌸 हाजी सलीम शेख फत्तू (हाजी शेखा मिस्त्री)
मा. नगरसेवक, अमळनेर


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed