विश्वास, कार्य आणि विकास — हाजी सलीम शेख फत्तू पुन्हा जनतेसमोर”
अमळनेर येथील हाजी शेखा यांनी त्यांच्या नगरसेवक पदाच्या कार्यकाळात भागात अनेक विकासकामे राबविली आहेत. त्यामध्ये शादी हॉल बांधकाम, प्रत्येक गलीत पेवर ब्लॉक बसविणे, खरोट कब्रस्तान व वालकंपाऊंड विकसित करणे अशा अनेक उपक्रमांचा समावेश आहे.
त्यांच्या मनमिळाऊ स्वभावामुळे नागरिकांमध्ये त्यांना विशेष स्थान आहे. त्यांनी विधवा महिला, गरजू व वंचित घटकांना मदत करण्यासाठी नेहमी पुढाकार घेतला आहे.
हाजी शेखा म्हणाले, “माझ्या प्रभागातील नागरिकांनी मला नेहमी विश्वास आणि प्रेम दिले. पुन्हा एकदा संधी मिळाल्यास संधीचे सोने करून विकासाची गती अधिक वाढविण्याचा माझा संकल्प आहे.”
नागरिकांमधून त्यांच्या उमेदवारीला मोठा प्रतिसाद मिळत असून, जनतेचा विश्वास आणि आशीर्वाद त्यांच्यासोबत कायम राहील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे.
आपलाच —
हाजी सलीम शेख फत्तू (हाजी शेखा मिस्त्री)
मा. नगरसेवक, अमळनेर
