पदावर नसतानाही केले काम; आता फक्त संधीची अपेक्षा — चेतन राजपूत

0
New-Doc-11-12-2025-10.23.jpg

अमळनेर /आबिद शेख

अमळनेर नगरपरिषद सार्वत्रिक निवडणूक २०२५ च्या पार्श्वभूमीवर प्रभाग क्रमांक ९ (ब) मधून कर्तबगार, कार्यतत्पर आणि लोकाभिमुख व्यक्तिमत्व म्हणून चेतन देवसिंग राजपूत यांचे नाव मोठ्या प्रमाणात चर्चेत आहे. “आधी काम, मगच संधी!” या भूमिकेवर ठाम राहून त्यांनी गेल्या काही वर्षांत प्रभागातील अनेक विकासकामांचा यशस्वी पाठपुरावा केला आहे.

राजपूत यांनी पदावर नसतानाही नागरिकांच्या समस्या ओळखून विविध विकास कामे मार्गी लावली. श्री छत्रपती शिवाजी महाराज उद्यानाचे नूतनीकरण आणि सुशोभीकरण, बालकांसाठी खेळणी, ओपन जिम, जॉगिंग ट्रॅक, शनिमंदिर गल्लीत आकर्षक प्रवेशद्वार, शितलनाथ चौकाचे स्मारक निर्मिती, तसेच अनेक रस्त्यांचे नूतनीकरण — या सर्वांमध्ये त्यांचा पुढाकार राहिला आहे.

कोरोना काळातही राजपूत यांनी स्वतःचा विचार न करता नागरिकांना आरोग्य सुविधा, बेड्स आणि लसीकरण मोहिमेत सक्रिय सहभाग देऊन मदत केली. प्रभागात स्वच्छता, स्ट्रीटलाईट्स, पाणीपुरवठा, वृक्षारोपण यांसारख्या नागरी सोयींवर त्यांनी नेहमी लक्ष केंद्रित ठेवले आहे.

सामाजिक व सांस्कृतिक क्षेत्रातही त्यांचे योगदान उल्लेखनीय आहे. न्यू प्लॉट विकास मंच आणि महिला मंचच्या माध्यमातून नवरात्र उत्सव, गणेशोत्सव, तसेच विविध सामाजिक उपक्रमांद्वारे सर्व समाजघटकांना एकत्र आणण्याचे कार्य त्यांनी केले आहे.

राजपूत यांनी सांगितले की, “अजूनही न्यू प्लॉट, महाराणा प्रताप व टिळक मित्र मंदिर परिसर, राजपूत बाजारपेठ, वसई देवी परिसर, शिवशक्ती चौक, बाहेरपुरा भाग अशा ठिकाणी अनेक विकासकामे प्रलंबित आहेत. नागरिकांनी संधी दिल्यास प्रभागात विकासाची नवी नांदी निर्माण करणार आहे.”

चेतन देवसिंग राजपूत हे अमळनेर शहर व तालुका पत्रकार संघाचे अध्यक्ष, दैनिक जनवास्तवचे संपादक, तसेच नगरपरिषद शिक्षण मंडळाचे माजी उपसभापती असून, न्यू प्लॉट परिसर विकास मंचाचे अध्यक्ष आहेत.

त्यांच्या कार्यशैलीमुळे आणि सेवाभावी वृत्तीमुळे नागरिकांमध्ये त्यांना चांगला प्रतिसाद मिळत असून, प्रभाग क्रमांक ९ ‘ब’ मधील निवडणुकीत त्यांची उमेदवारी ही सध्या चर्चेचा विषय ठरत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed