कन्हेरे येथे चिंचदेवी यात्रोत्सवाच्या पार्श्वभूमीवर रंगली बैलगाडी शर्यत..

0
New-Doc-11-12-2025-06.46.jpg


अमळनेर /आबिद शेख

सुमारे ४०० वर्षांची परंपरा कायम राखत दरवर्षीप्रमाणे यंदाही कार्तिक महिन्याच्या अष्टमी निमित्त कन्हेरे येथे चिंचदेवी यात्रोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. १२ नोव्हेंबरपासून सुरू झालेला हा दोन दिवसांचा सोहळा श्रद्धा आणि उत्साहाच्या वातावरणात पार पडत आहे.

यात्रोत्सवाच्या पार्श्वभूमीवर १० नोव्हेंबर रोजी पारंपरिक बैलगाडी शर्यतीचे आयोजन करण्यात आले. या शर्यतीचे उद्घाटन इंजिनिअर संगीता दिनेश पाटील यांच्या हस्ते करण्यात आले.

या शर्यतीत छत्रपती संभाजीनगर, जालना, अहिल्यानगर, नाशिक, जळगाव या जिल्ह्यांमधून सुमारे ९० बैलगाड्यांनी सहभाग नोंदविला. अत्यंत उत्साहात पार पडलेल्या शर्यतीत विजेत्यांना आकर्षक बक्षिसे देण्यात आली.

यावेळी दहिवद माजी सरपंच जयवंत गुलाबराव पाटील, पं.स.चे माजी उपसभापती सुभाष देसले, दहिवद माजी उपसरपंच प्रवीण माळी, संकल्प बचत गट प्रमुख गोकुळ माळी, ग्रामपंचायत सदस्य शिवाजी पारधी, चिंचदेवी प्रतिष्ठानचे अध्यक्ष अरुण पुंडलिक पाटील तसेच रवींद्र नागराज पाटील, बारकू गोरख पाटील, गोविंद आप्पा, दिनेश पाटील, विलास पाटील, सुपडू पाटील, संजीव भाऊसाहेब, मधुकर पाटील, गोपाल नेरकर आदी मान्यवर उपस्थित होते.

१२ नोव्हेंबर रोजी सकाळी चिंचदेवी मंदिराला ध्वज लावून यात्रोत्सवाला प्रारंभ झाला असून, पंचक्रोशीतील हजारो भाविक श्रद्धा आणि भक्तीभावाने या पारंपरिक सोहळ्याचा आनंद घेत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed