अमळनेर नगरपरिषद निवडणूक उमेदवारीसाठी नळपट्टी व घरपट्टी संदर्भात हरकत दाखल.

0
New-Doc-11-11-2025-12.58.jpg

आबिद शेख/अमळनेर

अमळनेर नगरपरिषद निवडणूक निर्णय अधिकारी यांच्याकडे अर्जदार अनंता रमेश निकम आणि संदीप बाबुराव घोरपडे यांनी एक हरकत अर्ज सादर केला आहे.

या अर्जात नमूद करण्यात आले आहे की, निवडणूक उमेदवारांकडून 31 डिसेंबर 2025 पर्यंत घरपट्टी आणि नळपट्टी भरल्याची अट ठेवण्यात आली असून, ही बाब नियमबाह्य असल्याचा आरोप करण्यात आला आहे. अर्जदारांच्या मते, 2024-25 या आर्थिक वर्षातील घरपट्टी आणि नळपट्टी पूर्णपणे भरलेली असल्याने 2026 पर्यंतची मागणी करणे अयोग्य आहे.

तसेच, न. पा. अमळनेर कडून ५०० टक्के वाढीव कर आकारणी करण्यात येत असल्याचेही अर्जदारांनी निदर्शनास आणून दिले, आणि या वाढीव कर वसुलीला तात्काळ स्थगिती द्यावी, अशी मागणी केली आहे.

अर्जदारांनी याबाबत निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांना लेखी हरकत नोंदवून योग्य ती कारवाई करण्याची विनंती केली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed