पाटोदा (बु) सरपंच सुनिल नामवाड यांचा काँग्रेस पक्षात प्रवेश..

0
New-Doc-11-11-2025-12.40.jpg

24 प्राईम न्यूज 11 Nov 2025

लातूर : तालुक्यातील मौजे पाटोदा (बु) येथील सरपंच सुनिल नामवाड यांनी लातुरचे खासदार डॉ. शिवाजी काळगे व लातुर जिल्हाध्यक्ष आभय साळुंखे यांच्या प्रमुख उपस्थितीत झालेल्या काँग्रेस पक्षाच्या तालुका निहाय आढावा बैठक व कार्यकर्त्यांच्या पक्ष प्रवेश सोहळ्यात काँग्रेस पक्षात प्रवेश केला.

या प्रसंगी तालुक्यातील सरपंच संघटनेतील काही सरपंच, उपसरपंच, सदस्य यांनीही काँग्रेस पक्षात प्रवेश करून पक्षाच्या बळकटीस हातभार लावला.

या कार्यक्रमाच्या निमित्ताने तालुक्याच्या पक्षीय वाटचालीचा आढावा घेण्यात आला, तसेच आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर विविध गावांतील पक्ष संघटनात्मक आणि स्थानिक राजकीय परिस्थितीबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली.

बैठकीदरम्यान तालुक्यातील प्रतिनिधींनी आपापले अहवाल पक्ष नेतृत्वासमोर सादर केले. मांडलेल्या सूचनांवर पक्षश्रेष्ठींनी गांभीर्यपूर्वक ऐकून घेत मार्गदर्शन केले.

या कार्यक्रमास युवा नेते सचिन केंद्रे, काँग्रेसचे तालुका अध्यक्ष मारोती पांडे, आशिष राजुरकर, काँग्रेस शहराध्यक्ष महेश धुळशेट्टे, माजी सरपंच मेहताब बेग, नगरसेवक संग्राम नामवाड, युवा नेते प्रमोद दाडगे, नवनाथ नामवाड आदी मान्यवर उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed