अमळनेर शहर विकास आघाडीसाठी १२९ उमेदवारांच्या मुलाखती पार. अनेक प्रभागांत चुरस, उमेदवारांनी कोअर कमिटीला दिले सर्वाधिकार.

0
New-Doc-11-09-2025-10.47.jpg

आबिद शेख/अमळनेर

अमळनेर :अमळनेर नगरपरिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शहर विकास आघाडीकडून इच्छुक उमेदवारांची मुलाखत प्रक्रिया काल दिनांक ८ नोव्हेंबर रोजी आमदार अनिल भाईदास पाटील, माजी आमदार कृषिभूषण साहेबराव पाटील तसेच कोअर कमिटी सदस्य यांच्या उपस्थितीत उत्साहात पार पडली.

एकूण १८ प्रभागांतील ३६ जागांसाठी तब्बल १२९ उमेदवारांनी मुलाखती दिल्या. अनेक प्रभागांत इच्छुकांची संख्या जास्त असल्याने चुरस वाढली होती. तथापि, सर्व उमेदवारांनी खेळीमेळीच्या वातावरणात कोअर कमिटीला सर्वाधिकार देत, “कमिटीचा जो निर्णय असेल, तो आम्हाला मान्य राहील आणि निवड झालेल्या उमेदवाराचा सर्वांनी मिळून प्रचार करू,” अशी ग्वाही दिली.

ही मुलाखत प्रक्रिया सकाळी १० वाजेपासून सायंकाळपर्यंत अखंड सुरू होती. यावेळी अनेक माजी नगरसेवक तसेच नवोदित इच्छुकांनी आघाडीकडून उमेदवारीची इच्छा व्यक्त केली.

आज नगराध्यक्ष पदासाठी मुलाखती
लोकनियुक्त नगराध्यक्ष पदासाठी शहर विकास आघाडीकडून निवडणूक लढविण्याच्या दृष्टीने इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती आज दिनांक ९ नोव्हेंबर रोजी सकाळी १०.३० वाजता आमदार अनिल पाटील यांच्या चोपडा रस्त्यावरील क्रेशर मशीनवर घेण्यात येणार आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed