अमळनेरातील समाजसेवक मो. इमरान आरीफ भाया तेली यांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश.

0
New-Doc-11-08-2025-12.45.jpg


आबिद शेख/ अमळनेर

अमळनेर शहरातील परिचित सामाजिक कार्यकर्ते आणि शिरीष दादा मित्र परिवाराचे कट्टर समर्थक मो. इमरान आरीफ भाया तेली यांनी आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात अधिकृत प्रवेश केला आहे.
राज्याचे उपमुख्यमंत्री मा. ना. अजितदादा पवार आणि माजी मंत्री आमदार अनिलदादा पाटील यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवत त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करण्याचा निर्णय घेतला.

या प्रवेशावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे माननीय आमदार जिशान बाबा सिद्दीकी, आमदार सना नवाब मलिक यांच्या हस्ते त्यांचा पक्षप्रवेश करण्यात आला.
या वेळी माजी मंत्री व आमदार अनिलदादा पाटील, नजीब मुल्ला, ऍड. नाझेर काझी, मा. आ. कुशी भूषण साहेब रावदादा पाटील तसेच पक्षाचे इतर प्रमुख नेते व कार्यकर्ते उपस्थित होते.

मो. इमरान आरीफ भाया हे अमळनेर शहर काँग्रेस (आय) चे माजी शहराध्यक्ष, माजी नगरसेवक आणि माजी आरोग्य सभापती मा. मो. शफी भाया यांचे सुपुत्र असून, समाजसेवेतील त्यांचे योगदान उल्लेखनीय राहिले आहे.
अमळनेर शहरातील सामाजिक, धार्मिक आणि सर्वसामान्यांच्या प्रश्नांबाबत ते नेहमीच पुढाकार घेत आले आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed