प्रभाग ९ मध्ये पुन्हा हक्काच्या माणसाची तयारी — पंकज पंडित चौधरी लवकरच जनतेच्या भेटीला!

0
New-Doc-11-08-2025-09.38.jpg

आबिद शेख/अमळनेर


अमळनेर नगरपरिषद सार्वत्रिक निवडणूक 2025 च्या पार्श्वभूमीवर प्रभाग क्रमांक 09 (ब) मधून पंकज पंडित चौधरी यांनी पुन्हा एकदा जनतेचा आशीर्वाद मिळविण्यासाठी तयारी सुरू केली आहे. आपल्या प्रभागातील तसेच शहरातील अनेक प्रश्नांसाठी ते सदैव प्रयत्नशील राहिले असल्याचे त्यांनी सांगितले.

“आपल्या साथीने, आशीर्वादाने आणि प्रेरणेने अनेक समस्या सोडवण्यात यश आले आहे. वेळप्रसंगी संघर्ष करून प्रशासनाला नागरिकांच्या अडचणींकडे लक्ष देण्यास भाग पाडले आहे. शहराची ओळख असलेला दगडी दरवाजा पुनर्निर्माण असो, रस्त्यांचे प्रश्न असोत, दिव्यांग बांधवांचे विषय असोत किंवा व्यापारी व अतिक्रमित बांधवांच्या अडचणी — प्रत्येक वेळी मी आपल्या हक्कासाठी लढलो आणि यशस्वी झालो,” असे चौधरी यांनी सांगितले.

“प्रामाणिक सेवा, पारदर्शक काम, सर्वसमावेशक विकास” या घोषवाक्यासह त्यांनी आगामी निवडणुकीत पुन्हा जनतेचा विश्वास संपादन करण्याचा निर्धार व्यक्त केला आहे.

“तुमचा विश्वास माझी ताकद,” असे म्हणत पंकज पंडित चौधरी लवकरच प्रत्यक्ष भेटीसाठी प्रभागातील मतदारांच्या घरी जाणार असल्याची माहिती दिली आहे.

  • आपला हक्काचा माणूस –
    पंकज पंडित चौधरी, प्रभाग क्र. 09 (ब)

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed