अमळनेर न्यायालयात ‘वंदे मातरम’ गीताचे १५० वर्ष पूर्ण — सरकारी वकील व कोर्ट कर्मचाऱ्यांचा सामूहिक गायन सोहळा..
आबिद शेख/ अमळनेर

अमळनेर दिनांक ८ नोव्हेंबर २०२५ रोजी राष्ट्रगीत ‘वंदे मातरम’ या अमर देशभक्तीपर गीताला १५० वर्ष पूर्ण झाल्याच्या निमित्ताने अमळनेर न्यायालयात विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. या निमित्ताने सरकारी वकील कार्यालय तसेच कोर्टातील सर्व कर्मचारी वर्गांनी एकत्र येऊन वंदे मातरमचे सामूहिक गायन केले.

या कार्यक्रमात सरकारी वकील किशोर आर. बागुल, आर. बी. चौधरी यांच्यासह अमळनेर न्यायालयात काम करणारे सर्व पैरवी अधिकारी, केस वाच कर्मचारी तसेच न्यायालयातील अन्य अधिकारी-कर्मचारी उपस्थित होते. देशभक्तीचे वातावरण निर्मित करणाऱ्या या सामूहिक गायनाने न्यायालय परिसर दुमदुमून गेला.
‘वंदे मातरम’ गीताला १५० वर्ष पूर्ण होण्याचा हा ऐतिहासिक क्षण सर्वांनी देशभक्तीच्या भावनेने साजरा केला. सहभागी सर्वांनी देशासाठी निष्ठा, एकता आणि सेवा या मूल्यांची पुन्हा एकदा जाणीव करून दिली.

