अमळनेर नगरपरिषद निवडणूक २०२५ : भाजपचा विजय संकल्प, उमेदवारांच्या मुलाखती आज.

0
New-Doc-11-08-2025-06.40.jpg

आबिद शेख/ अमळनेर


अमळनेर नगरपरिषद निवडणूक २०२५ च्या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पार्टीकडून “भाजप विजय संकल्प” अंतर्गत उमेदवारांच्या मुलाखती आयोजित करण्यात आल्या आहेत. या मुलाखती ८ नोव्हेंबर २०२५ (शनिवार) रोजी दुपारी १२ वाजता स्वामी विवेकानंद इंग्लिश मिडीयम स्कूल, गलवाडे रोड, अमळनेर येथे पार पडणार आहेत.

या कार्यक्रमासाठी मा. गिरीशभाऊ महाजन यांच्या मार्गदर्शनाखाली अनेक मान्यवर उपस्थित राहणार आहेत. त्यामध्ये
मा. संजयजी सावकारे (वस्त्रउद्योग मंत्री, महाराष्ट्र शासन)
खासदार स्मिताताई वाघ
निवडणूक प्रमुख आमदार मंगेशदादा चव्हाण
आमदार राजूमामा भोळे
जिल्हाध्यक्ष डॉ. राधेश्यामजी चौधरी
तालुका निवडणूक प्रभारी पोपट तात्या भोळे
यांचा समावेश आहे.
पक्षाच्या वतीने सर्व इच्छुक उमेदवार व कार्यकर्त्यांना वेळेवर उपस्थित राहण्याचे आवाहन शहराध्यक्ष योगेश महाजन यांनी केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed