गुन्ह्याची माहिती न दिल्यास विजयी उमेदवारही ठरणार अपात्र.

24 प्राईम न्यूज 8 Nov 2025. सर्वोच्च न्यायालयाचा महत्वाचा निर्णय गुन्हेगारी माहिती लपवणाऱ्या उमेदवारांना अपात्र ठरवले जाणार

निवडणूक अर्ज दाखल करताना उमेदवाराने आपल्या विरोधातील कोणतीही गुन्हेगारी शिक्षा किंवा प्रकरणाची माहिती लपवली, जरी ती शिक्षा उच्च न्यायालयाने रद्द केलेली असली तरीही, अशा उमेदवाराला विजय मिळाल्यानंतरही अपात्र ठरवले जाईल, असा ऐतिहासिक निर्णय सर्वोच्च न्यायालयाने शुक्रवारी दिला आहे.

हा निर्णय बिहार विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर दिला गेला असून, त्यामुळे राजकीय पक्षांना मोठा धक्का बसला आहे. सर्वोच्च न्यायालयाने स्पष्ट केले आहे की, मतदारांपासून सत्य लपवणे म्हणजे पारदर्शक लोकशाही प्रक्रियेचा भंग आहे, आणि अशा प्रकरणात उमेदवाराची पात्रता रद्द करणेच योग्य ठरेल.
या निर्णयामुळे आगामी निवडणुकांमध्ये उमेदवारांच्या शपथपत्रांतील माहिती तपासण्यावर अधिक भर दिला जाण्याची शक्यता आहे.

