अमळनेर न्यायालयात वंदे मातरम गीताचे 150 वर्ष पूर्णत्वानिमित्त सामूहिक गायन..

आबिद शेख/अमळनेर
अमळनेर : आज रोजी “वंदे मातरम” या राष्ट्रगीताला 150 वर्ष पूर्ण झाल्याच्या औचित्याने अमळनेर न्यायालयात विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. या निमित्ताने अमळनेर येथील सरकारी वकील कार्यालय तसेच न्यायालयातील कर्मचारी वर्गाने एकत्रितपणे वंदे मातरम गीताचे सामूहिक गायन केले.

या कार्यक्रमात अमळनेर न्यायालयात कार्यरत सरकारी वकील किशोर आर. बागुल, आर. बी. चौधरी तसेच पैरवी अधिकारी, केस वाच आणि न्यायालयीन कर्मचारी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. कार्यक्रमादरम्यान देशभक्तीचे वातावरण निर्माण झाले होते.

अमळनेर न्यायालय परिसरात झालेल्या या सामूहिक गायनाने उपस्थितांनी देशभक्तीचा संकल्प पुन्हा दृढ केला.

