मा. आमदार कृषिभूषण साहेबराव पाटील यांच्या उपस्थितीत राजवड येथे भिलाली-शेगाव पायी वारी पालखीचे उत्साहात स्वागत..

0
New-Doc-11-06-2025-08.39.jpg


आबिद शेख/अमळनेर


राजवड (आदर्शगाव) :श्री क्षेत्र भिलाली ते श्री क्षेत्र शेगाव अशी दरवर्षीप्रमाणे आयोजित करण्यात येणारी वर्ष ३ री पायी वारी व पालखी रथ सोहळा अत्यंत श्रद्धा आणि भक्तिभावाने पार पडला. या पवित्र वारीतील पालखीचे आगमन राजवड (आदर्शगाव) येथे झाल्याने गावात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले.

या वेळी पालखीचे स्वागत मा. आमदार कृषिभूषण साहेबराव पाटील व जिजामाता सौ. पुष्पलता साहेबराव पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. ग्रामस्थांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून पारंपरिक वाद्यांच्या निनादात पालखीचे स्वागत केले.

वारकऱ्यांनी “जय जय राम कृष्ण हरी”, “जय श्रीराम”अशा जयघोषात वारीचे स्वागत करत दर्शनाचा लाभ घेतला. श्रद्धा, भक्ती आणि एकतेचा संदेश देणारा हा सोहळा गावकऱ्यांच्या सहभागामुळे अविस्मरणीय ठरला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed