अखिल महाराष्ट्र सफाईगार व चतुर्थ श्रेणी कर्मचारी संघटना अमळनेर शाखेचा फलक अनावरण व कार्यकारिणी जाहीर कार्यक्रम उत्साहात संपन्न..

आबिद शेख/अमळनेर अमळनेर — अखिल महाराष्ट्र सफाईगार व चतुर्थ श्रेणी कर्मचारी संघटना शाखा अमळनेर यांच्या वतीने नगरपरिषद अमळनेर येथे फलक अनावरण कार्यक्रम उत्साहात संपन्न झाला. या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून संघटनेचे राज्य अध्यक्ष मा. श्री नागेशजी कंडारे व राज्य कोषाध्यक्ष श्री धनराज पिवाळ उपस्थित होते.

कार्यक्रमात अमळनेर शाखेची नवीन कार्यकारिणी जाहीर करण्यात आली. नाशिक विभाग अध्यक्ष म्हणून अनिल सुभाष बेंडवाल यांची निवड करण्यात आली. अमळनेर शाखा सचिवपदी किशोर संगेले, उपाध्यक्षपदी यश लोहेरे, कार्याध्यक्षपदी नरेश घोगले, कोषाध्यक्षपदी शिवचरण संगेले, उपाध्यक्षपदी रमेश कलोसे, सहसचिवपदी अनिल बाविस्कर, प्रसिद्धी प्रमुखपदी सुरेश चव्हाण, संपर्क प्रमुखपदी राम कलोसे, सहकोषाध्यक्षपदी सागर पवार व संघटकपदी अक्षय बेडवाल यांची नियुक्ती करण्यात आली.

नवीन पदाधिकाऱ्यांना नियुक्तीपत्रे राज्य अध्यक्ष मा. नागेशजी कंडारे यांच्या हस्ते प्रदान करण्यात आली.
कार्यक्रमास संघटनेचे पदाधिकारी श्री सोमचंद संदानशिव, श्री प्रसाद शर्मा, श्री अविनाश संदानशिव, तसेच अमळनेर नगरपरिषदेचे आरोग्य निरीक्षक मा. संतोष जाधव, मा. किरण कंडारे, मा. संतोष माणिक साहेब आदी मान्यवर उपस्थित होते.
या कार्यक्रमामुळे सफाईगार व चतुर्थ श्रेणी कर्मचारी संघटनेत नवा उत्साह संचारला असून संघटनात्मक बळकटीसाठी ही कार्यकारिणी प्रभावीपणे काम करेल असा विश्वास उपस्थितांनी व्यक्त केला.

