अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीचे पंचनामे करण्याचे आदेश — कृषिभूषण साहेबराव पाटील यांचे आवाहन..

0
New-Doc-11-03-2025-07.07.jpg

आबिद शेख/अमळनेर

अमळनेर :दि. २७ ऑक्टोबर ते ३० ऑक्टोबर २०२७ या कालावधीत झालेल्या अवकाळी पर्जन्यमानामुळे अमळनेर, पारोळा आणि परिसरातील शेतकऱ्यांच्या पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. स्वयंचलित हवामान केंद्राच्या आकडेवारीनुसार अमळनेर तालुक्यात ७३.२० मिमी, पारोळ्यात ३६.५० मिमी तर शेळाये मंडळात तब्बल १२९.९० मिमी इतका पाऊस झाला असून हा सरासरीपेक्षा अधिक आहे.

या पार्श्वभूमीवर मा.आ.श्री. अनिलदादा पाटील (माजी मंत्री, अमळनेर) आणि मा.आ.श्री. अमोलदादा पाटील यांच्या सूचनेनुसार जिल्हाधिकारी, उपविभागीय अधिकारी, तहसीलदार तसेच तालुका कृषि अधिकारी यांच्या बैठकीत शेतकऱ्यांच्या झालेल्या नुकसानीचे सरसकट पंचनामे करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

या आदेशानुसार तहसीलदार, अमळनेर व पारोळा यांनी तत्काळ पंचनामे सुरू करण्याचे निर्देश दिले असून, शेतकऱ्यांनी प्रशासनास पूर्ण सहकार्य करावे, असे आवाहन कृषिभूषण साहेबराव पाटील (माजी आमदार, अमळनेर) यांनी केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed