‘अभिजात मराठी’ पॅनलचा विजय — डॉ. अविनाश जोशी अध्यक्षपदी, भैय्यासाहेब मगर कार्यवाहपदी..

0
New-Doc-11-04-2025-07.35.jpg

आबिद शेख/ अमळनेर

अमळनेर — मराठी वाङमय मंडळाच्या त्रैवार्षिक निवडणुकीत ‘अभिजात मराठी’ पॅनलने मोठा विजय मिळवला आहे. या निवडणुकीत पॅनलचे प्रमुख डॉ. अविनाश जोशी यांनी ‘परिवर्तन’ पॅनलचे प्रमुख शरद सोनवणे यांचा पराभव करून अध्यक्षपदी विजय मिळविला. या निकालामुळे मंडळाच्या कारभारात नवचैतन्य येण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

या निवडणुकीत इतर विजयी उमेदवारांमध्ये विवेकानंद भांडारकर, डॉ. रवींद्र कुलकर्णी, भैय्यासाहेब मगर, प्रा. श्याम पवार, प्रदीप साळवी, प्रा. उदय देशपांडे, ईश्वर चिठ्ठी, वसुंधरा लांडगे, स्नेहा एकतारे, डॉ. महेश पाटील, बन्सीलाल भागवत, प्रा. विजय तुंटे, कांचन शाह, सोमनाथ ब्रह्मे, संदीप घोरपडे आणि के. व्ही. कुलकर्णी यांचा समावेश आहे.

विशेष म्हणजे, भैय्यासाहेब मगर सर यांची म.वा. वाचनालय कार्यवाहपदी निवड झाली असून त्यांच्या निवडीबद्दल सर्वत्र अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

डॉ. जोशी यांच्या नेतृत्वाखालील नव्या कार्यकारिणीकडून मराठी वाङमयाचा प्रसार, वाचनसंस्कृतीचा प्रचार आणि तरुण पिढीला साहित्याशी जोडणारे नवे उपक्रम राबविण्याचा संकल्प व्यक्त करण्यात आला आहे.

निवडणुकीनंतर विजयी उमेदवारांचे समर्थकांनी फटाक्यांच्या आतषबाजीत आणि गुलाल उधळून जल्लोषात स्वागत केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed