प्रवीण पाटील यांची युवासेना अमळनेर शहरप्रमुख पदी निवड..

0
New-Doc-11-03-2025-06.45.jpg

आबिद शेख/अमळनेर

अमळनेर :वंदनीय हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या आशिर्वादाने, हिंदुत्वाचा विचार व धर्मवीर आनंद दिघे यांच्या शिकवणीवर प्रेरित होत, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली प्रवीण पुरुषोत्तम पाटील (साने नगर) यांची युवासेना अमळनेर शहरप्रमुख पदी निवड करण्यात आली आहे.

या नियुक्तीची घोषणा खासदार डॉ. श्रीकांत शिंदे, युवासेना कार्याध्यक्ष पूर्वेश सरनाईक आणि युवासेना जिल्हाध्यक्ष रोहित कोगटा यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. पक्षश्रेष्ठींनी दाखविलेल्या विश्वासाला पात्र ठरून शिवसेना वाढीसाठी निष्ठेने कार्यरत राहण्याचा निर्धार प्रवीण पाटील यांनी व्यक्त केला.

नियुक्तीनंतर अमळनेर येथील शिवसेना कार्यालयात त्यांचा सत्कार करण्यात आला. या प्रसंगी पालकमंत्री गुलाबराव पाटील, आमदार अमोल पाटील, माजी जि.प. सदस्य प्रतापराव पाटील, जिल्हाप्रमुख वासुदेव पाटील, वैद्यकीय सेना उत्तर महाराष्ट्र प्रमुख जितेंद्र गवळी, तालुकाप्रमुख सुरेश अर्जुन पाटील, शहरप्रमुख संजय कौतिक पाटील, वैद्यकीय सेना तालुका प्रमुख प्रमोद शिंपी, माजी उपजिल्हाप्रमुख डॉ. राजेंद्र पिंगळे, उपतालुका प्रमुख भूषण कोळी, व्यापारी सेना शहरप्रमुख अमित ललवाणी, तालुका संघटक गजेंद्र जाधव, प्रसिद्ध प्रमुख अनिल पवार तसेच अल्पसंख्याक शहरप्रमुख शोएब शेख यांनी शुभेच्छा दिल्या.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed