गुरे चोरी प्रकरणातील फरार आरोपी दोनडाईच्यात अटक. – अमळनेर पोलिसांची यशस्वी कारवाई..

0
New-Doc-11-02-2025-08.01.jpg

आबिद शेख/अमळनेर
जळगाव जिल्ह्यात वाढत्या गुरे चोरीच्या घटनांच्या पार्श्वभूमीवर स्थानिक गुन्हे शाखेने तपास सुरू केला होता. गुप्त माहिती आणि तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे २२ ऑक्टोबर २०२५ रोजी चार आरोपींना ताब्यात घेण्यात आले. हे आरोपी पुढीलप्रमाणे आहेत —
१. शाकीर शहा अरमान शहा (रा. सुप्रीम कॉलनी, जळगाव)
२. अमजद शेख फकीर कुरेशी (रा. अशोक किराणा, मेहरून, जळगाव)
३. आफताब आलम शेख रहीम (रा. नशिराबाद, जळगाव)
४. अकील कादिर पिंजारी (रा. आझाद नगर, पिंप्राळा हुडको, जळगाव)

चौकशीत आरोपींनी अमळनेर पोलीस ठाणे क्षेत्रातील दोन व पहूर ठाणे क्षेत्रातील एका गुर चोरीची कबुली दिली. तपासादरम्यान रात्री साडेअकरा वाजता अमळनेरजवळ चांदणीकुहे गावाजवळ रेल्वे बोगद्याजवळ सरकारी वाहनाची गती कमी झाल्याचा फायदा घेत शाकीर शहा आणि अमजद शेख हे दोघे आरोपी वाहनातून उडी मारून अंधारात पसार झाले. या घटनेबाबत अमळनेर पोलीस ठाण्यात कलम २६२ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला.

पोलिस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी यांच्या आदेशानुसार विशेष पथक गठीत करण्यात आले. गुप्त माहिती आणि तांत्रिक तपासाच्या आधारे आरोपी दिल्लीमध्ये असल्याचे समोर आले. त्यानुसार २७ ऑक्टोबर रोजी दिल्लीहून अमजद शेखला अटक करून २८ ऑक्टोबर रोजी अमळनेर पोलीस ठाण्यात हजर करण्यात आले. चौकशीत त्याने शाकीर शहा अजमेरला गेल्याचे सांगितले.

अमळनेर पोलिसांची टीम अजमेरला रवाना झाली, परंतु तो तेथे सापडला नाही. पुढील माहितीच्या आधारे शाकीर शहा दोनडाईचा येथे लपल्याचे समोर आले. त्यानुसार पोलिसांनी ३१ ऑक्टोबर २०२५ रोजी तात्काळ कारवाई करत दोनडाईचा येथे शाकीर शहा यास अटक करून अमळनेर पोलीस ठाण्यात आणले.

ही संपूर्ण कारवाई पोलिस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी, अपर पोलिस अधीक्षक कविता नेरकर, उपविभागीय अधिकारी विनायक कोटे आणि वरिष्ठ पोलिस निरीक्षक राहुल गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक जितेंद्र वल्टे, शेखर डोमाळे, रवी नरवडे व त्यांच्या पथकाने यशस्वीरित्या पूर्ण केली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed