मारवड रस्त्यावर एसटी व दुचाकीची जोरदार धडक – धार येथील वृद्ध जखमी..
आबिद शेख/अमळनेर

अमळनेर: तालुक्यातील मारवड रस्त्यावर झालेल्या अपघातात धार येथील गयासोद्दीन बद्रोद्दीन मुजावर (वय ६८) हे गंभीर जखमी झाले आहेत. हा अपघात १ नोव्हेंबर रोजी सकाळी सुमारे १०:४५ वाजता पिंपऱ्या नाल्याजवळ घडला.

गयासोद्दीन मुजावर हे हिरो स्प्लेंडर दुचाकीवरून अमळनेरकडून धारकडे जात असताना समोरून येणाऱ्या एमएच २० बीएल १४३० क्रमांकाच्या एसटी बसने भरधाव वेगात दुचाकीला जोरदार धडक दिली. या धडकेत मुजावर यांच्या डोक्याला, हाताला, पायाला आणि छातीला गंभीर दुखापत झाली.

अपघातानंतर बसचालक घटनास्थळावरून पसार झाला. दरम्यान, मागून येणारे त्यांचे आतेभाऊ आणि इतर प्रवाशांनी जखमी मुजावर यांना तातडीने अमळनेर येथील खाजगी रुग्णालयात दाखल केले.
या प्रकरणी अब्दुल अलीम अब्दुल हकीम मुजावर यांनी दिलेल्या फिर्यादीवरून बसचालक बापू भगवान ठा याच्याविरुद्ध अमळनेर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास हेड कॉन्स्टेबल विनोद सोनवणे करत आहेत.
