डॉ. शशिकांत पाटील यांना ‘इन्स्टिट्यूशन ऑफ इंजिनिअरिंग अँड टेक्नॉलॉजी’ (IET) तर्फे फेलोशिप बहाल..
आबिद शेख/अमळनेर

मुंबई – ‘अॅटलस स्किलटेक युनिव्हर्सिटी’, मुंबई येथील संगणक अभियांत्रिकी विभागाचे प्राध्यापक डॉ. शशिकांत पाटील यांची द इन्स्टिट्यूशन ऑफ इंजिनिअरिंग अँड टेक्नॉलॉजी (IET), युनायटेड किंगडम तर्फे फेलो (FIET) म्हणून निवड करण्यात आली आहे.

या नियुक्तीबाबत संस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आणि सचिव एड आल्मंड (Ed Almond) यांनी पत्राद्वारे डॉ. पाटील यांचे अभिनंदन केले आहे. फेलोशिप मिळाल्याने डॉ. पाटील यांना IET च्या जागतिक ७,३०० हून अधिक फेलो सदस्यांच्या प्रतिष्ठित समूहात स्थान मिळाले आहे.

या फेलोशिपमुळे डॉ. पाटील यांना व्यावसायिक प्रगतीसाठी अधिक संधी मिळणार असून, अभियांत्रिकी क्षेत्रातील आपले अनुभव आणि तज्ज्ञता जागतिक स्तरावर मांडता येणार आहे. तसेच IET तर्फे आयोजित तांत्रिक कार्यक्रम, प्रकाशने आणि धोरण विषयक कार्यात योगदान देण्याची संधी मिळेल.
‘इन्स्टिट्यूशन ऑफ इंजिनिअरिंग अँड टेक्नॉलॉजी’ ही आंतरराष्ट्रीय स्तरावरील अग्रगण्य संस्था असून, ती अभियांत्रिकी क्षेत्रातील नवोन्मेष, संशोधन आणि नेतृत्व यांना प्रोत्साहन देते.
डॉ. पाटील यांची ही निवड ही अभियांत्रिकी क्षेत्रासाठी अभिमानाची बाब मानली जात आहे.

