शिरुड नाका परिसरात रानडुकरांचा धुमाकूळ; वृद्ध व्यक्ती गंभीर जखमी.

0
New-Doc-11-01-2025-23.58.jpg

आबिद शेख/अमळनेर

अमळनेर – शिरुड नाका परिसरात आज सकाळी रानडुकरांनी अक्षरशः धुमाकूळ घातला. या हल्ल्यात गजानन आनंदा चौधरी (वय ८५) हे गंभीर जखमी झाले आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, गजानन चौधरी हे सकाळी सहा वाजता दूध घेण्यासाठी बाहेर पडले असता अचानक रानडुकरांनी त्यांच्यावर हल्ला चढवला. या घटनेत त्यांना गंभीर दुखापत झाली असून, परिसरातील नागरिकांनी तत्काळ त्यांना उपचारासाठी डॉ. अनिल शिंदे यांच्या दवाखान्यात दाखल केले.

या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. काही अन्य नागरिकांवरही डुकरांनी हल्ला करण्याचा प्रयत्न केल्याची माहिती मिळाली आहे. स्थानिक नागरिकांनी प्रशासनाने तातडीने उपाययोजना करून रानडुकरांच्या त्रासावर नियंत्रण आणावे, अशी मागणी केली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed