ताडेपुरा तलाव परिसरात साचलेल्या सांडपाण्यामुळे नागरिक त्रस्त; डेंगू, साप व किटकांचा वाढता उपद्रव..

अमळनेर :ताडेपुरा परिसरातील तलावाजवळ साचलेल्या सांडपाण्यामुळे स्थानिक नागरिकांचे दैनंदिन जीवन विस्कळीत झाले आहे. तलावाचे सुशोभीकरणाचे काम सुरू असल्याने ठेकेदाराने परिसरातील गटार व सांडपाण्याचा नैसर्गिक प्रवाह बंद केल्याची तक्रार नागरिकांनी केली आहे. परिणामी तलावाच्या परिसरात सांडपाणी साचत असून त्यातून डेंगूच्या डासांची वाढ, गोगलगायी, साप आणि इतर किटकांचा उपद्रव वाढला आहे.

ताडेपुरा भागातील रहिवासी राहुल भास्कर कंजर यांनी अमळनेर नगरपरिषद मुख्याधिकारी यांच्याकडे दिलेल्या लेखी तक्रारीत सांगितले आहे की, या परिस्थितीमुळे नागरिकांना गंभीर आरोग्यधोका निर्माण झाला असून दैनंदिन जगणे कठीण झाले आहे.

नागरिकांनी नगरपरिषदेकडे तातडीने लक्ष घालून सांडपाण्याचा निचरा करण्यासाठी योग्य ती उपाययोजना करावी, अशी मागणी केली आहे.
