अवकाळी पावसाने खरीप हंगाम उद्ध्वस्त – अमळनेरात सरसकट पंचनाम्याची मागणी; माजी आमदार कृषिभूषण साहेबराव पाटील यांचे आमदार अनिलदादा पाटील यांना निवेदन सादर..

0
New-Doc-10-31-2025-15.24.jpg

आबिद शेख अमळनेर
अमळनेर –केंद्र शासनाने विहित केलेल्या १२ नैसर्गिक आपत्ती व्यतिरिक्त राज्य शासनाने, शासन निर्णय दिनांक ३० जानेवारी २०१४ अन्वये “अवेळी पाऊस” तसेच शासन निर्णय दिनांक २२ जून २०२३ अन्वये “सततचा अवेळी पाऊस” ही नैसर्गिक आपत्ती म्हणून घोषित केली आहे.

या पार्श्वभूमीवर ऑक्टोबर २०२५ मध्ये अमळनेर विधानसभा मतदारसंघात ७ ते ८ दिवसांपासून पडत असलेल्या सततच्या अवकाळी पावसामुळे संपूर्ण खरीप हंगामातील पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाल्याने त्यांच्यावर आर्थिक संकट कोसळले आहे.

या परिस्थितीत स्थानिक प्रशासनाने तात्काळ सरसकट पंचनामे करून संबंधित विभागाकडे प्रस्ताव पाठवून शेतकऱ्यांना दिलासा मिळावा, यासाठी माजी आमदार कृषिभूषण साहेबराव पाटील यांनी ‘सिंदूर’ सह लेखी निवेदन माननीय आमदार अनिलदादा पाटील यांना सादर केले.

या निवेदनात पंचनामे विलंब न करता तत्काळ करण्याची आणि शेतकऱ्यांना मदत देण्यासाठी शासनाकडे त्वरीत पाठपुरावा करण्याची मागणी करण्यात आली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed