अमळनेरात ‘एकता दौड’ उत्साहात पार; ३५० नागरिकांचा उत्स्फूर्त सहभाग..

0
New-Doc-11-01-2025-06.52.jpg

आबिद शेख/अमळनेर
अमळनेर :- लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांच्या १५०व्या जयंतीनिमित्त राष्ट्रीय एकता दिवस २०२५ च्या औचित्याने जळगाव जिल्हा पोलीस दल व अमळनेर पोलीस स्टेशनतर्फे ‘एकता दौड’चे आयोजन करण्यात आले.

ही दौड महाराणा प्रताप चौक येथून सुरू होऊन मंगळ ग्रह मंदिर येथे संपन्न झाली. कार्यक्रमाचे उद्घाटन आमदार अनिल पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. उद्घाटनानंतर आमदार पाटील यांनी स्वतःही या एकता दौडीत सहभाग घेतला.

या प्रसंगी नगरपरिषद अमळनेरचे मुख्याधिकारी, विविध शासकीय कार्यालयांचे अधिकारी-कर्मचारी, सामाजिक व राजकीय क्षेत्रातील पदाधिकारी, महाविद्यालये व शाळांतील शिक्षक, माजी सैनिक, पत्रकार, वकील, तरुण मित्र परिवार, शांतता समिती सदस्य, महिला दक्षता समिती सदस्य, पोलीस पाटील, होमगार्ड तसेच भरतीपूर्व प्रशिक्षण घेणारे विद्यार्थी आणि मॉर्निंग वॉक ग्रुपचे सदस्य अशा सुमारे ३०० ते ३५० नागरिकांनी उत्स्फूर्तपणे सहभाग घेतला.

या ‘एकता दौड’च्या माध्यमातून समाजात राष्ट्रीय एकात्मता, बंधुता आणि ऐक्याचा संदेश देण्यात आला.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed