गुर चोरीची फिर्याद नाकारली; साहेब नाही म्हणून पोलिसांनी घेतली नाही तक्रार – शेतकऱ्यांमध्ये संताप.

आबिद शेख/ अमळनेर
अमळनेर तालुक्यातील सबगव्हाण येथे परवा रात्री दोन गुर चोरीला गेल्याची घटना घडली आहे. या प्रकरणी संबंधित शेतकरी मारवड पोलीस स्टेशनला फिर्याद नोंदवण्यासाठी गेले असता, पोलिसांनी “साहेब नाहीत म्हणून फिर्याद घेता येणार नाही” असे सांगून तक्रार नोंदवण्यास नकार दिल्याचे समजते.

शेतकरी आधीच नैसर्गिक आपत्तीमुळे हताश झाला असताना, पशुधन चोरीसारखी घटना अधिकच दु:खद ठरत आहे. पोलिसांनी अशा तक्रारींवर तातडीने आणि संवेदनशीलतेने कार्यवाही करणे आवश्यक असल्याची भावना शेतकरी वर्गातून व्यक्त होत आहे.

अशा घटनांकडे तत्परतेने पाहून शेतकऱ्यांचा विश्वास परत मिळविणे गरजेचे असल्याचे स्थानिकांचे मत आहे.

