बेड्यांसह आरोपी फरार प्रकरणात एलसीबीचे चारही पोलिस निलंबित..

0
New-Doc-10-26-2025-09.57.jpg

आबिद शेख/ अमळनेर

अमळनेर — अमळनेर तालुक्यातील लोणे व पिंपळे येथील गुरे चोरी प्रकरणातील आरोपींना जळगावहून अमळनेर येथे आणत असताना दोन सराईत गुन्हेगार पोलिसांच्या तावडीतून बेड्यांसह फरार झाले होते. या प्रकरणी पोलीस अधीक्षक महेश्वर रेड्डी यांनी गांभीर्याने दखल घेत चारही एलसीबी पोलिस कर्मचाऱ्यांना निलंबित केले आहे.

एलसीबीचे पोलीस संदीप पाटील, प्रवीण मांडोळे, हरीलाल पाटील आणि राहुल कोळी यांनी तांत्रिक तपासाच्या आधारे आरोपींना पकडले होते. जळगाव येथील अकील कादिर पिंजारी, शाकीर शाह अरमान शाह, अमजद शेख फकीर कुरेशी आणि आफताब आलम शेख रहीम या चोरट्यांना २२ ऑक्टोबर रोजी रात्री अमळनेरकडे आणताना ही घटना घडली.

रात्री साडेअकराच्या सुमारास कुहे गावाजवळील सती माता मंदिराजवळील रेल्वे अंडरपास येथे वाहन हळू होताच शाकीर शाह व अमजद शेख यांनी संधी साधून मागच्या सीटवरून वाहनातून उडी घेत अंधारात पळ काढला. दोघेही शेतातील पिकांमध्ये गायब झाले. या घटनेनंतर पोलिस दलावर नामुष्की ओढवली होती.

घटनेची माहिती मिळताच पोलीस अधीक्षक रेड्डी यांनी चौकशीचे आदेश देत चौघांना कर्तव्यात कसुरी केल्याचा ठपका ठेवून निलंबित केले आहे. दरम्यान, फरार आरोपींच्या शोधासाठी एलसीबीचे विशेष पथक रवाना झाले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed