अमळनेरमध्ये साने गुरुजी विद्यालयात 10 दिवसीय गायन व वादन कार्यशाळा सुरू..

0
New-Doc-10-26-2025-06.51-1.jpg

आबिद शेख/अमळनेर

अमळनेर : शहराच्या मध्यवर्ती भागातील साने गुरुजी विद्यालयात 10 दिवसीय गायन व वादन संगीत कार्यशाळा सुरू झाली आहे. संगीताची आवड असलेल्या तसेच या क्षेत्रात करिअर करु इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी ही कार्यशाळा एक उत्तम संधी ठरत आहे.

कार्यशाळेत संगीत शिक्षक तुषार पुराणिक यांच्या मार्गदर्शनाखाली सहभागी विद्यार्थ्यांना गायन व वादनाच्या विविध अंगांबद्दल प्रत्यक्ष प्रशिक्षण दिले जाणार आहे. तसेच या कालावधीत संगीत क्षेत्रातील अनेक जाणकार व्यक्ती विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यासाठी उपस्थित राहणार आहेत.

कार्यशाळा दि. 26 ऑक्टोबर ते 4 नोव्हेंबर 2025 दरम्यान सकाळी 10 ते दुपारी 3:30 या वेळेत आयोजित करण्यात आली असून सहभाग शुल्क केवळ ₹1100 ठेवण्यात आले आहे.

या कार्यशाळेचे आयोजन श्री. संदीप बाबुराव घोरपडे (सचिव) आणि श्री. हेमकांत अनंतराव पाटील यांच्या पुढाकाराने करण्यात आले आहे. इच्छुकांनी अधिक माहितीसाठी मो. 94222 79710 या क्रमांकावर संपर्क साधावा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed