श्रीकृष्ण सॉमिल ते राजाराम नगर रस्त्याचे काँक्रीटीकरण काम सुरू — आमदार अनिल पाटील यांच्या हस्ते भूमिपूजन..
आबिद शेख/ अमळनेर

अमळनेर :– शहरातील शिरुड नाका परिसरातील श्रीकृष्ण सॉमिल ते राजाराम नगरपर्यंतच्या रस्त्याचे काँक्रीटीकरण कामाचे भूमिपूजन आमदार अनिल पाटील यांच्या हस्ते पार पडले.
हा कार्यक्रम २३ ऑक्टोबर रोजी सायंकाळी ६ वाजता छत्रपती शिवाजी नगर येथील बाळासाहेब ठाकरे चौकात संपन्न झाला. या रस्त्याच्या कामासाठी तब्बल ९० लाखांचा निधी आमदार अनिल पाटील यांच्या प्रयत्नातून मंजूर करण्यात आला असून, माजी नगरसेवक प्रताप शिंपी यांच्या पाठपुराव्यामुळे हे काम मंजूर झाले आहे.

भुयारी गटार व २४x७ पाणीपुरवठा पाइपलाइनच्या कामामुळे या रस्त्याची अवस्था अत्यंत खराब झाली होती. त्यामुळे नागरिक व वाहनधारकांना मोठ्या गैरसोयींचा सामना करावा लागत होता. अखेर काँक्रीटीकरणाचे काम सुरू होत असल्याने परिसरातील नागरिकांमध्ये समाधानाचे वातावरण आहे.

या भूमिपूजन कार्यक्रमास माजी नगरसेवक प्रताप शिंपी, जितेंद्र ठाकूर, विनोद लांबोळे, चेतन राजपूत, जीवन पवार, अरुण पाटील, शरद पाटील, विक्रांत पाटील, मुन्ना शेख यांच्यासह नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. आमदार अनिल पाटील व मान्यवरांवर नागरिकांकडून पुष्पवृष्टी करून जोरदार स्वागत करण्यात आले.

