सोने ८ हजारांनी घसरले, चांदीतही ७ हजारांची पडझड — दिवाळीनंतर भाऊबीजेच्या दिवशी सोन्याच्या बाजारात खळबळ..

0
New-Doc-10-24-2025-07.29.jpg

24 प्राईम न्यूज 24 Oct 2025

मुंबई :दिवाळीनंतर भाऊबीजेच्या दिवशी सुवर्ण बाजारात मोठी उलथापालथ पाहायला मिळाली. गुरुवारी सोन्याच्या दरात तब्बल ८ हजार रुपयांची घसरण झाली असून, १० ग्रॅम सोन्याचा भाव १ लाख ३३ हजारांवरून थेट १ लाख २६ हजारांवर आला आहे.

फक्त सोनंच नव्हे तर चांदीच्या दरातही मोठी घसरण झाली आहे. चांदीचा दर १ लाख ६९ हजारांवरून घसरून १ लाख ६२ हजारांवर आला आहे. या अचानक झालेल्या घसरणीमुळे बाजारात खळबळ उडाली असून गुंतवणूकदार आणि ग्राहक यांच्यात चर्चेला उधाण आले आहे.

सुवर्ण व्यावसायिकांच्या माहितीनुसार, ही घसरण सट्टा बाजारातील नफेखोरीमुळे तात्पुरती झाली आहे. दिवाळी काळात दरांमध्ये झालेल्या वाढीनंतर गुंतवणूकदारांनी नफा वसूल करण्यासाठी विक्रीचा दबाव वाढवला, त्यामुळे दर खाली आले.

तथापि, तज्ञांच्या मते ही घसरण दीर्घकाळ टिकणारी नसून, आगामी काळात सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा वाढ होण्याची शक्यता आहे. आंतरराष्ट्रीय बाजारातील अस्थिरता, डॉलरच्या तुलनेत रुपयाची स्थिती आणि मध्यपूर्वेतील तणावपूर्ण परिस्थिती यामुळे दर पुन्हा वाढू शकतात.

सध्या बाजारात सोन्याची खरेदी किंमत कमी झाल्याने अनेक ग्राहकांनी सुवर्ण खरेदीकडे वळण्याची शक्यता आहे. दागिन्यांच्या विक्रेत्यांकडून ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी विविध सवलतीच्या योजना जाहीर केल्या जात आहेत.

“सोन्याच्या दरातील सध्याची घसरण ही नफेखोरीचा परिणाम असून, दीर्घकालीन गुंतवणुकीसाठी हे योग्य वेळ मानला जात आहे. येत्या काही आठवड्यांत दर पुन्हा वाढीचा कल दर्शवू शकतात,” असे मुंबईतील सुवर्ण व्यापारी संघटनेचे पदाधिकारी म्हणाले.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed