दिवाळीनिमित्त समाजसेवक अशोक गोरड यांच्याकडून अनाथ व वृद्धांना कपड्यांचे वाटप.

0
New-Doc-10-22-2025-06.40.jpg

24 प्राईम न्यूज 22 Oct 2025


सोलापूर :दिवाळीच्या पार्श्वभूमीवर गोरगरीब, अनाथ आणि उघड्यावर राहणाऱ्या वृद्ध व्यक्तींना आनंद देण्याच्या उद्देशाने ए. डी. फाऊंडेशन महाराष्ट्र राज्य चे प्रमुख व निःस्वार्थी समाजसेवक, जनतेचे आधारस्तंभ मा. श्री. अशोक श्रीपती गोरड यांनी सामाजिक बांधिलकी जपत एक आदर्श उपक्रम राबविला.

आज सोलापूर सिव्हिल हॉस्पिटल परिसर, स्टेशन जवळील शनी मंदिर आणि सिद्धेश्वर मंदिर येथे राहणाऱ्या अनाथ आणि वृद्ध व्यक्तींना त्यांनी कपड्यांचे वाटप करून दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा दिल्या.

या वेळी शिवमल्हार सोसायटी सोलापूर चे सचिव मा. गुरु अचलेरे सर आणि मा. मातनाळे सर उपस्थित होते. या उपक्रमामुळे समाजात माणुसकीचे आणि परस्पर प्रेमाचे एक सुंदर उदाहरण निर्माण झाले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed