बेकायदा वाळू उपसा प्रकरणात दबावाचा प्रकार उघड — तलाठ्यावर बोगस तक्रारींचा धमकीचा आरोप.
आबिद शेख/अमळनेर

अमळनेर — वावडे परिसरात बेकायदा वाळू उपसा थांबवण्यासाठी प्रशासनाने केलेल्या कारवाईनंतर गावकऱ्यांनी सांगितले की, कारवाई झाल्यापासून कोणीही नदीत उतरलेले नाही. या कारवाईच्या वेळी गुन्हेगाराचे ट्रॅक्टर पकडण्यात आले होते.

या ट्रॅक्टरला सोडण्यासाठी संबंधित तलाठ्यावर मोठा दबाव आणण्यात आला होता. मात्र तलाठ्याने हा दबाव झुगारला. त्यानंतर ट्रॅक्टर मालकाने त्याला बोगस तक्रारी करण्याची धमकी दिल्याचे समोर आले आहे.
घटनेच्या ठिकाणी तहसीलदार श्री. रुपेशकुमार सुराणा, मंडळ अधिकारी पी. एस. पाटील (वावडे भाग), ग्रामसेवक संदीप माळी (मांडळ), एम. आर. पाटील (जैतपीर) तसेच पोलिस पाटील (मांडळ) हे उपस्थित होते.
या संपूर्ण प्रकरणामुळे वाळू माफियांचा दबाव प्रशासनावर किती वाढला आहे हे स्पष्ट झाले असून, या प्रकरणाची सखोल चौकशी होण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे.


