अमळनेर उपविभागीय अधिकारी नितीनकुमार मुंडावरे यांची पदोन्नती — अप्पर जिल्हाधिकारी पदावर बदली..

0
New-Doc-10-21-2025-06.51.jpg

आबिद शेख/अमळनेर

अमळनेर — येथील उपविभागीय अधिकारी नितीनकुमार मुंडावरे यांची पदोन्नती होऊन मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण येथे अप्पर जिल्हाधिकारी म्हणून बदली करण्यात आली आहे.

या संदर्भात महाराष्ट्र शासन महसूल व वन विभाग चे उपसचिव महेश वरूडकर यांनी २० ऑक्टोबर रोजी आदेश काढून रिक्त पदांवर पदोन्नती व पदस्थापना केली आहे.

नितीनकुमार मुंडावरे हे कार्यतत्पर अधिकारी म्हणून ओळखले जातात. त्यांच्या कार्यकाळात कोणतेही दाखले प्रलंबित ठेवले गेले नाहीत. विविध प्रकरणांची सुनावणी जलद गतीने करून नागरिकांना योग्य न्याय मिळवून देण्यात त्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली. प्रशासकीय कामकाजात त्यांचा चांगला वचक होता.

त्यांच्या पदोन्नतीबद्दल शहरात व तालुक्यात सर्वत्र अभिनंदनाचे वातावरण आहे. स्थानिक नागरिक, सामाजिक संस्था आणि शासकीय यंत्रणेतील अधिकारी-कर्मचारी यांनी त्यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed