चौथी व सातवी शिष्यवृत्ती परीक्षा पुन्हा सुरू — विद्यार्थ्यांसाठी मोठा निर्णय..
24 प्राईम न्यूज 19 Oct 2025

राज्यातील विद्यार्थ्यांसाठी शिक्षण विभागाकडून एक महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे. पुढील शैक्षणिक वर्षापासून चौथी आणि सातवीच्या विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती परीक्षा पुन्हा घेण्यात येणार आहे. शिक्षण विभागाने या निर्णयास मान्यता दिल्याची माहिती समोर आली आहे.

या परीक्षेमुळे विद्यार्थ्यांची बुद्धिमत्ता, ज्ञान आणि स्पर्धात्मक तयारीची चाचणी घेतली जाणार आहे. ग्रामीण तसेच शहरी भागातील गुणवंत विद्यार्थ्यांना प्रोत्साहन मिळण्यासाठी ही परीक्षा उपयुक्त ठरणार आहे. शासनाकडून लवकरच वेळापत्रक व अभ्यासक्रमाबाबत मार्गदर्शक सूचना जाहीर केल्या जाण्याची शक्यता आहे.
दरम्यान, शिक्षक व पालक वर्गातून या निर्णयाचे स्वागत करण्यात आले आहे. “ही शिष्यवृत्ती परीक्षा विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीस नवी दिशा देणारी ठरेल,” अशी प्रतिक्रिया अनेकांकडून व्यक्त करण्यात आली आहे.


