कृउबा संचालकांच्या अपात्रतेवर ३ महिन्यात निर्णय घ्या — उच्च न्यायालयाचा आदेश..

आबिद शेख/अमळनेर अमळनेर तालुक्यातील कृषी उत्पन्न बाजार समितीतील दोन संचालकांनी निवडणुकीनंतरच्या ६० दिवसांच्या मुदतीत निवडणूक खर्च सादर केला नव्हता, तर १८ संचालकांनी खर्चासाठी आवश्यक ते बँक खातेही उघडले नव्हते. त्यामुळे त्यांनी मधील कलम ६७ (ब) तसेच निवडणूक प्राधिकरण आदेशातील तरतुदींचा भंग केल्याचे निदर्शनास आले. या पार्श्वभूमीवर गावरान जागल्या सेनेने जिल्हा उपनिबंधकांकडे संचालकांना अपात्र घोषित करण्याची तक्रार दाखल केली होती.


जिल्हा उपनिबंधकांनी याबाबत सकारात्मक अहवाल एक वर्षांपूर्वीच पणन संचालकांकडे पाठवला होता. मात्र, त्यावर अद्याप कोणताही निर्णय झाला नव्हता.
या विलंबाविरोधात प्रा. विश्वासराव पाटील यांनी ऍड. मोहनिश थोरात यांच्या माध्यमातून ात याचिका दाखल केली होती. न्या. विभा कंकणवाडी आणि न्या. हितेन वेनेगावकर यांनी तीन महिन्यांच्या आत निर्णय घेण्याचे स्पष्ट आदेश दिले आहेत.
आता १४ जानेवारी रोजी संचालक मंडळावर ‘संक्रांत’ येते की ‘संक्रांत गोड’ होते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.


