गुणवंत विद्यार्थ्यांचा व श्रावण बाळांचा सन्मान सोहळा रविवारी..

0
New-Doc-10-18-2025-11.30.jpg

आबिद शेख/अमळनेर

अमळनेर :अमळनेर येथील श्री. वरणेश्वर महादेव मंदिर संस्थान आणि डॉ.सौ. माधुरी मनोहर भांडारकर बहुउद्देशीय संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने दरवर्षीप्रमाणे याही वर्षी गुणवंत विद्यार्थ्यांचा आणि श्रावण बाळांचा सन्मान सोहळा आयोजित करण्यात आला आहे.

या कार्यक्रमात तालुक्यातील दहावी व बारावीच्या परीक्षेत 85% पेक्षा जास्त गुण मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांचा तसेच तालुक्यातून शासकीय सेवेत निवड झालेल्या अधिकाऱ्यांचा सत्कार करण्यात येणार आहे. तसेच वृद्ध आई-वडिलांची निस्वार्थ सेवा करणाऱ्या मान्यवरांना श्रावण बाळ पुरस्कार देऊन गौरविण्यात येणार आहे.

हा सन्मान सोहळा रविवार, 19 ऑक्टोबर 2025 रोजी वर्णेश्वर महादेव मंदिर परिसरात पार पडणार आहे. या निमित्ताने अजय रघुनाथ केले, विजयसिंह आधारसिंग राजपूत, रवींद्र घनश्याम पाटील, हेमंत मनोहर भांडारकर व सुभाष हरचंद चौधरी यांच्या समावेश असलेली पाच सदस्यीय समिती स्थापन करण्यात आली आहे. समितीने खालील मान्यवरांची नावे निवडून जाहीर केली आहेत —

रमेश बुधा शिरसाट, रहेमतुल्ला बैतुल्ला पिंजारी, शशिकांत दत्तात्रेय चौधरी, प्रशांत भदाणे, चेतन महाजन, प्रशांत मनोहर वाणी, जयेश व उमेश काटे, जगन्नाथ पाटील, भरतसिंग परदेशी, रमेश चिंधा चौधरी, ॲड. तिलोत्तमा पाटील, रवींद्र सोमा महाजन.

कार्यक्रमास कामगार उपायुक्त विजय चौधरी, त्र्यंबकेश्वर येथील डीवायएसपी श्री. वासुदेव देसले, अमळनेर येथील डीवायएसपी श्री. विनायक कोते, पोलीस निरीक्षक श्री. दत्तात्रेय निकम, मार्केट कमिटी संचालक सौ. सुषमा ताई देसले तसेच अन्य मान्यवर उपस्थित राहणार आहेत.

या सन्मान सोहळ्याला मोठ्या संख्येने नागरिकांनी उपस्थित राहावे, असे आयोजकांनी आवाहन केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed