चिमनपुरी पिंपळे खु. येथे शेतीपंप वीजपुरवठा विस्कळीत — शेतकऱ्यांचा जीव धोक्यात..

0
New-Doc-10-18-2025-10.19.jpg

आबिद शेख/ अमळनेर

अमळनेर तालुक्यातील चिमनपुरी पिंपळे खु. परिसरात शेतीपंपासाठीचा वीजपुरवठा अत्यंत विस्कळीत झाला असून शेतकऱ्यांना मोठ्या समस्यांना सामोरे जावे लागत आहे. आठवड्यात केवळ तीन दिवस दिवसा आणि पाच दिवस रात्री वीजपुरवठा होत असला तरी शुक्रवार, शनिवार आणि रविवार दिवसा वीजपुरवठा बंदच राहतो.

या कालावधीत लाईनवरील जम्प तुटणे, डीपी जळणे यांसारख्या तांत्रिक अडचणींमुळे शेतकऱ्यांना फेस टाकण्यासाठी जीव धोक्यात घालावा लागतो. योग्य वेळी पाणी न मिळाल्याने पिकांचे नुकसान होण्याची शक्यता वाढली आहे.

शेतकऱ्यांनी संबंधित विभागाकडे तातडीने दखल घेऊन नियमित वीजपुरवठा सुरू करण्याची मागणी केली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed