वाचन प्रेरणा दिनानिमित्त वाचन सप्ताह — समाजातील सर्व घटकांपर्यंत ‘साधना’ दिवाळी अंकाचे वितरण..
आबिद शेख/अमळनेर

अमळनेर माजी राष्ट्रपती यांच्या जयंतीनिमित्त अमळनेर, भडगाव, पारोळा व चाळीसगाव तालुक्यात वाचन सप्ताह साजरा करण्यात आला. वाचन प्रेरणा दिनानिमित्त ‘साधना’ साप्ताहिकाचा बालकुमार व युवा दिवाळी अंक समाजातील विविध घटकांपर्यंत पोहोचविण्यात आला.
या उपक्रमाअंतर्गत भाजीविक्रेते, वस्ती शाळा, तांडा, चहा विक्रेते, पोलीस यंत्रणा, एसटी कर्मचारी व रिक्षाचालक यांना भेट देऊन वाचनाचे महत्त्व समजावण्यात आले. पालक आणि मुलांनी वाचनाचे जीवनातील स्थान ओळखावे यासाठी संवाद साधण्यात आला.
या उपक्रमात सुयोग राजपूत, सचिन पाखले, सुशांत जगताप, दर्शना पवार, देवा चौधरी, विवेक सुर्यवंशी, धिरेंद रावते, मधूभाऊ चौधरी यांसह व चे कार्यकर्ते सहभागी झाले होते.
या उपक्रमातून समाजातील सर्व घटकांमध्ये वाचनाची आवड निर्माण करून ज्ञानाची ज्योत पेटविण्याचा प्रयत्न करण्यात आला.


