अमळनेरमध्ये सुवर्ण विश्वासाचा नवा टप्पा — एस के ज्वेलर्सची दुसरी शाखा आज शुभारंभ..

0
New-Doc-10-17-2025-22.57.jpg

आबिद शेख/अमळनेर

अमळनेर :विश्वास आणि पारदर्शकतेचा सुवर्ण प्रवास घडवणाऱ्या या नावाला अमळनेरकरांचा अढळ विश्वास लाभला आहे. १९८८ साली सूर्यकांत भामरे (बापू) यांनी सराफ बाजारात छोट्याशा सुवर्ण पेढीची सुरुवात केली. प्रामाणिकपणा, सौजन्य आणि विश्वास या बळावर त्यांनी ग्राहकांच्या मनात खास स्थान निर्माण केले. सोनं घेणं म्हणजे ‘एस के ज्वेलर्स’ — हेच नाव ग्राहकांच्या ओठांवर आपोआप येऊ लागलं.

आज हा सुवर्ण वारसा सचिन भामरे यांनी आधुनिकतेच्या स्पर्शाने अधिक तेजाळवला आहे. वडिलांचे संस्कार आणि आई-वडिलांचा आशीर्वाद या बळावर त्यांनी व्यवसायाला नव्या उंचीवर नेले आहे. त्यांना पत्नी कोमल भामरे यांची मोलाची साथ लाभली असून नम्र व आपुलकीच्या वागणुकीमुळे ग्राहकांशी घट्ट नातं जपलं गेलं आहे.

या सुवर्ण प्रवासाचा पुढचा टप्पा म्हणून, आज धनतेरसच्या शुभ मुहूर्तावर स्टेशन रोडवरील नगरपालिकेजवळ एस के ज्वेलर्सची दुसरी शाखा भव्य उद्घाटन सोहळ्यासह सुरू होत आहे. “आमच्या ग्राहकांनी दाखवलेला विश्वास, प्रेम आणि पाठिंबा यामुळेच हा विस्तार शक्य झाला,” असे सचिन भामरे यांनी कृतज्ञतेने सांगितले.

भामरे परिवार आणि मित्रमंडळींकडून या शुभ प्रसंगी सर्व नागरिकांना उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed