माजी खासदार उन्मेष पाटील यांच्या वक्तव्याविरोधात महायुतीचा संतप्त आंदोलन — पुतळा जाळून निषेध..

0
New-Doc-10-17-2025-09.56.jpg

आबिद शेख/अमळनेर

अमळनेर : शहरात आज यांच्या वक्तव्याचा निषेध करत महायुतीच्या कार्यकर्त्यांनी जोरदार आंदोलन केले. दि. १५ रोजी शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळावी आणि ओला दुष्काळ जाहीर करावा या मागणीसाठी महाविकास आघाडी तर्फे शेतकरी आक्रोश मोर्चा काढण्यात आला होता. त्यानंतर प्रांताधिकारी कार्यालयात झालेल्या चर्चेदरम्यान माजी खासदारांनी सरकारी अधिकारी, खासदार आणि आमदारांविषयी केलेल्या शिवराळ भाषेच्या वापराचा तीव्र विरोध महायुतीकडून करण्यात आला.

या निषेधार्थ कार्यकर्त्यांनी महाराणा प्रताप चौकात रास्ता रोको करत घोषणाबाजी केली. उन्मेष पाटील यांच्या छायाचित्रांवर काळे फासून आणि चप्पल बुटांनी मारहाण करून अखेर पुतळा जाळत संताप व्यक्त करण्यात आला.

माजी खासदारांनी उपविभागीय अधिकारी उद्देशून केलेल्या अशोभनीय वक्तव्याचा निषेध नोंदवत महायुतीच्या पदाधिकाऱ्यांनी पोलिसांकडे गुन्हा दाखल करण्याची मागणी केली. “जर हिंमत असेल तर त्यांनी पुन्हा अमळनेरात येऊन असेच बोलून दाखवावे,” असे आव्हान भाजप शहराध्यक्ष यांनी दिले.

या आंदोलनात डॉ. अनिल शिंदे, माजी जि.प. सदस्य व्ही. आर. पाटील, माजी प.स. सभापती शाम अहिरे, प्रफुल पाटील, राकेश पाटील, शितल देशमुख, संदीप पाटील, माधुरी पाटील, देवा लांडगे, शिवाजी राजपूत, योगेश पाटील, दिनेश पाटील, कैलास भावसार, कमल कोचर, गौरव महाजन, दिपक पाटील, भैय्यासाहेब वाल्मिक पाटील, विवेक पाटील, अँड. यज्ञेश्वर पाटील, अँड. रमाकांत महाजन, राजेश पाटील, भूषण भदाणे, निलेश देशमुख, सुनील शिंपी, भरतसिंग परदेशी, दिलीप ठाकूर, राम कालोशे, इम्रान खाटीक, मुक्तार खाटीक, बाळू पाटील, अख्तर तेली, सुरेश तात्या, विजय राजपूत, हेमत चौधरी, बापू काटे यांसह शेकडो कार्यकर्ते व पदाधिकारी उपस्थित होते.

आंदोलनादरम्यान काही काळ वाहतूक खोळंबली होती. यावेळी पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवला होता. महायुतीच्या निषेध आंदोलनामुळे परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed