तालुकास्तरीय लोकशाही दिनाचे आयोजन — नागरिकांना अर्ज दाखल करण्याचे आवाहन..

आबिद शेख/अमळनेर दिनांक 27 ऑक्टोबर 2025 रोजी सकाळी 11.00 वाजता तालुकास्तरीय लोकशाही दिनाचे आयोजन करण्यात येत आहे. या दिवशी नागरिकांना विविध शासकीय समस्या व तक्रारींबाबत अर्ज दाखल करण्याची संधी मिळणार आहे.

लोकशाही दिनाच्या माध्यमातून नागरिकांना त्यांच्या प्रश्नांचे सादरीकरण करून समाधान मिळविण्यासाठी हे व्यासपीठ उपलब्ध करून देण्यात आले आहे. त्यामुळे नागरिकांनी या उपक्रमाचा लाभ घ्यावा, असे आवाहन तहसिलदार अमळनेर यांच्या मार्फत करण्यात आले आहे.

