अमळनेरमध्ये अनधिकृत रेती वाहतूक करणारा डंपर जप्त..

0
New-Doc-10-17-2025-07.01.jpg

आबिद शेख/ अमळनेर

अमळनेर : मौजे गलवाडे रोड, अमळनेर रस्त्यावर कारवाई करताना महसूल विभागाने अनधिकृत गौण खनिज रेती वाहतूक करणारा डंपर पकडला. ही कारवाई मा. उपविभागीय अधिकारी अमळनेर श्री. नितीनकुमार मुंडावरे व मा. तहसीलदार अमळनेर श्री. रुपेश कुमार सुराणा यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.

सदर डंपर ताब्यात घेऊन तहसील कार्यालय अमळनेर येथे जमा करण्यात आला आहे. या कारवाईदरम्यान पथकात ग्राम महसूल अधिकारी श्री. जितेंद्र पाटील (शिरसाले बु), श्री. संदीप माळी (मांडळ), श्री. विकेश भोई (बाम्हने), श्री. अमोल चक्रे (जवखेड़े), श्री. आकाश गिरी (पातोंडा), श्री. सुधीर पाटील (गडखाब), श्री. पवन शिंगारे (सावखेड़े) व श्री. अभिमान जाधव (कन्हेरे) हे उपस्थित होते.

महसूल विभागाच्या या तत्पर कारवाईमुळे अनधिकृत खनिज वाहतूक करणाऱ्यांमध्ये खळबळ उडाली आहे. अशा अनधिकृत वाहतुकीविरोधात पुढील काळातही कठोर पावले उचलली जाणार असल्याची माहिती प्रशासनाकडून देण्यात आली.

रवि ज्वेलर्स,अमळनेर,
सोने चांदी आजचे भाव

24 Ct सोने 99.50% : ₹. 131000

22 Ct सोने 91.60% : ₹. 120000

18 Ct सोने 75.00% : ₹. 99600

शुद्ध चांदी 999%:₹. 1750/-
भाव प्रती 10 ग्राम

22 कैरेट 916 हॉलमार्क दागिने मजूरी फ़क्त @ 5%

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed