प्रगतशील शेतकरी मीना पवार यांना ‘पद्मश्री सिंधुताई सपकाळ माई’ पुरस्कार जाहीर ..
फुलंब्री (संभाजीनगर): फुलंब्री तालुक्यातील प्रगतशील महिला शेतकरी शोभायोग्यवत् मा. मीना पवार यांना ‘पद्मश्री सिंधुताई सपकाळ माई’ पुरस्कार जाहीर झाला आहे. आपल्या जिद्दीच्या बळावर आणि अथक परिश्रमांच्या जोरावर त्यांनी शेतीत आदर्श घडविला आहे.
मीना पवार यांनी कठीण परिस्थितीवर मात करत आधुनिक शेतीचा अंगीकार केला. विविध प्रकारचे प्रयोग करून त्यांनी शेती व्यवसाय समृद्ध केला आहे. शेतीसोबत जोडव्यवसाय म्हणून पशुपालन आणि शेळीपालनातही त्यांनी उल्लेखनीय प्रगती साधली आहे.
केवळ शेतीपुरते मर्यादित न राहता त्या सामाजिक क्षेत्रातही सक्रिय आहेत. महिलांसाठी नेतृत्व, प्रेरणा आणि प्रोत्साहनाचे कार्य त्यांनी सातत्याने केले आहे. त्यांच्या कार्याची दखल घेत ‘पद्मश्री सिंधुताई सपकाळ माई’ पुरस्काराने त्यांना सन्मानित करण्यात येणार आहे.
या सन्मानाबद्दल फुलंब्री परिसरात आनंदाचे वातावरण असून महिलांसाठी प्रेरणादायी व्यक्तिमत्त्व म्हणून मीना पवार यांचं कौतुक होत आहे.
