स्थानिक बाजारपेठेतूनच खरेदी करा — ऑनलाइन खरेदीला ‘नाही’ म्हणत व्यापाऱ्यांना बळकटी देण्याचे आवाहन.

0
New-Doc-10-16-2025-11.34.jpg

आबिद शेख/अमळनेर

अमळनेर — आगामी सण-उत्सवांच्या पार्श्वभूमीवर स्थानिक अर्थव्यवस्था सक्षम ठेवण्यासाठी स्थानिक व्यापाऱ्यांकडूनच खरेदी करण्याचे आवाहन सामाजिक कार्यकर्त्या सौ. स्वप्ना विक्रांत पाटील यांनी केले आहे.

“सार्वजनिक उत्सवासाठी खरेदी करताना आपल्या परिसरातील व्यापाऱ्यांना प्राधान्य द्या. ऑनलाइन खरेदी टाळा, यामुळे आपल्या शहरातील बाजारपेठ मजबूत होईल,” असे त्या म्हणाल्या.

यावेळी त्यांनी नागरिकांना कुटुंबासह बाजारात खरेदीसाठी बाहेर पडण्याचे आवाहन केले. “बाजारपेठेत उत्साह निर्माण होतो, व्यापाऱ्यांचा आत्मविश्वास वाढतो आणि शहराची अर्थव्यवस्था सक्षम बनते,” असेही त्यांनी नमूद केले.

सौ. स्वप्ना विक्रांत पाटील (प्रभाग क्र. १७ अ, वह चौक, अमळनेर) यांच्यासह माजी नगरसेवक विक्रांत भास्करराव पाटील (श्रीकृष्णपुरा, वडचौक, अमळनेर) यांनी नागरिकांना सण साजरा करताना ‘आपला व्यापारी — आपली बाजारपेठ’ ही संकल्पना जोपासण्याचे आवाहन केले आहे.
📞 मोबाईल नं. : ९५७९६२३९२३

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed