जिल्हास्तरीय फुटबॉल स्पर्धेसाठी मुलं-मुलींसाठी महत्त्वाची सूचना..

जळगाव (प्रतिनिधी) : सब ज्युनिअर गर्ल्स व सब ज्युनिअर बॉईज आंतर जिल्हा फुटबॉल स्पर्धा शिरपूर येथे होत असून मुलींच्या स्पर्धा २५ ऑक्टोबरपासून तर मुलांच्या स्पर्धा ५ नोव्हेंबरपासून सुरू होत आहेत. या स्पर्धेत सहभागी होऊ इच्छिणाऱ्या खेळाडूंची जन्मतारीख १ जानेवारी २०११ ते ३१ डिसेंबर २०१२ दरम्यान असावी.

या स्पर्धेसाठी जिल्हा संघ निवड चाचणी दिनांक १५ ऑक्टोबरपासून , भुसावळ रोड, जळगाव येथील फुटबॉल मैदानावर सुरू झाली आहे. जे विद्यार्थी परीक्षेमुळे अनुपस्थित होते, त्यांनी आपले जन्म प्रमाणपत्र, आधार कार्ड आणि संपूर्ण किटसह दिनांक १७ ऑक्टोबर रोजी सकाळी ८ वाजता त्याच मैदानावर उपस्थित राहावे, असे आवाहन जिल्हा फुटबॉल संघटनेचे अध्यक्ष डॉ. उल्हास पाटील, सचिव फारुख शेख आणि कार्याध्यक्ष प्रा. डॉ. अनिता कोल्हे यांनी केले आहे.

