अमळनेर बाजार समितीच्या दोन संचालकांनी नियमाचे उल्लंघन — मा. उच्च न्यायालयाचा तीन महिन्यांत अंतिम आदेशाचा निर्देश.
आबिद शेख/ अमळनेर

अमळनेर — अमळनेर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडून आलेल्या १८ संचालकांपैकी २ संचालकांनी मधील नियम ६७ (ब) चे उल्लंघन केल्याचे उघड झाले आहे. तसेच सर्व १८ संचालकांनी सचिव, राज्य सहकारी निवडणूक प्राधिकरण, महाराष्ट्र राज्य, पुणे यांच्या दिनांक २१ जानेवारी २०२१ रोजीच्या आदेश क्रमांक ०९ च्या तरतुदीचे उल्लंघन केल्याची बाब समोर आली आहे.
या संदर्भातील सविस्तर चौकशी अहवाल मा. जिल्हा उपनिबंधक, सहकारी संस्था, जळगाव यांनी गावरानी जागल्या सेना संघटनेचे अध्यक्ष विश्वासराव पाटील यांच्या १८ डिसेंबर २०२३ रोजीच्या पत्रानुसार सखोल पडताळणीनंतर , पुणे यांना दिनांक ०५ सप्टेंबर २०२४ रोजी सादर केला होता. या चौकशी अहवालातील नमूद बाबींची दखल घेऊन अंतिम आदेश पारित करण्यात विलंब झाल्याने विश्वासराव पाटील यांनी अॅड. मोहनिश थोरात यांच्या मार्फत येथे याचिका दाखल केली होती.

या याचिकेवरील सुनावणीनंतर न्यायालयाने १४ ऑक्टोबर २०२५ रोजी आदेश पारित करून संचालक, पणन संचालनालय, पुणे यांना तीन महिन्यांच्या आत अंतिम आदेश पारित करण्याचे निर्देश दिले आहेत. त्यामुळे १४ जानेवारी २०२६ पर्यंत विद्यमान संचालक मंडळ कायम राहणार की त्यावर बदलाची कार्यवाही होणार, याबाबत आता प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

रवि ज्वेलर्स,अमळनेर,
सोने चांदी आजचे भाव
24 Ct सोने 99.50% : ₹. 130700
22 Ct सोने 91.60% : ₹. 119700
18 Ct सोने 75.00% : ₹. 99300
शुद्ध चांदी 999%:₹. 1880/-
भाव प्रती 10 ग्राम
22 कैरेट 916 हॉलमार्क दागिने मजूरी फ़क्त @ 5%
