मतदार यादीतील फेरफार प्रकरणात गंभीर आरोप — सखोल चौकशीची मागणी..

0
New-Doc-10-15-2025-23.15.jpg

आबिद शेख/अमळनेर
अमळनेर नगरपरिषद सार्वत्रिक निवडणूक 2025 च्या पार्श्वभूमीवर मतदार यादीत फेरफार झाल्याचा गंभीर आरोप करण्यात आला आहे. प्रभाग क्रमांक 4 मधील मतदार सौं. जिजाबाई सोमचंद संदानशिव यांनी प्रा. मुख्याधिकारी तथा सहा. निवडणूक निर्णय अधिकारी यांना दिलेल्या लेखी निवेदनात हा मुद्दा उपस्थित केला आहे.

जिजाबाई संदानशिव यांनी आपल्या अर्जात नमूद केले आहे की, “मी सुमारे 40 वर्षांपासून प्रभाग क्रमांक 4 मध्ये वास्तव्यास आहे. मात्र, संबंधित कर्मचाऱ्यांनी अनाधिकृतपणे मतदार यादीत फेरफार करून माझ्यासह माझ्या कुटुंबातील सदस्यांची नावे प्रभाग क्रमांक 5 मध्ये टाकली आहेत. त्यामुळे आमचा मतदानाचा हक्क हिरावला गेला आहे.”

तसेच, काही इच्छुक उमेदवार स्वत:च्या राजकीय फायद्यासाठी इतर प्रभागातील मतदारांची नावे गटागटाने प्रभाग क्रमांक 4 मध्ये समाविष्ट करण्याचा प्रयत्न करीत असल्याचाही गंभीर आरोप करण्यात आला आहे. या प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींवर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी अर्जात करण्यात आली आहे.

या अर्जाची प्रत राज्य निवडणूक आयोग, जिल्हाधिकारी कार्यालय जळगाव तसेच उपविभागीय अधिकारी, अमळनेर यांना पाठविण्यात आली असून या प्रकरणाने स्थानिक राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर या आरोपांची चौकशी महत्त्वाची ठरणार आहे.

रवि ज्वेलर्स,अमळनेर,
सोने चांदी आजचे भाव

24 Ct सोने 99.50% : ₹. 130700

22 Ct सोने 91.60% : ₹. 119700

18 Ct सोने 75.00% : ₹. 99300

शुद्ध चांदी 999%:₹. 1880/-
भाव प्रती 10 ग्राम

22 कैरेट 916 हॉलमार्क दागिने मजूरी फ़क्त @ 5%

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed