माहिती अधिकार कार्यकर्ते अमोल कोल्हे यांना राज्यस्तरीय सन्मान..
24 प्राईम न्यूज 14 Oct

पुणे – माहिती अधिकार चळवळीत उल्लेखनीय योगदान दिल्याबद्दल जळगाव जिल्ह्यातील माहिती अधिकार कार्यकर्ते अमोल अशोक कोल्हे यांना राज्यस्तरीय पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. हा सन्मान व यांच्या वतीने पुण्यात आयोजित तिसऱ्या महाअधिवेशनात प्रदान करण्यात आला.
हा भव्य सोहळा , येरवडा येथे १२ ऑक्टोबर २०२५ रोजी पार पडला. राज्यभरातील कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत कोल्हे यांना पुणे महानगरपालिकेचे मुख्य कामगार अधिकारी तसेच माहिती अधिकार नोडल अधिकारी श्री. नितीन केंजळे यांच्या हस्ते शाल, सन्मानपत्र व स्मृतीचिन्ह देऊन गौरविण्यात आले.
या कार्यक्रमाला ज्येष्ठ माहिती अधिकार कार्यकर्ते विवेक वेलणकर आणि प्रा. नामदेवराव जाधव प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते. दोन्ही मान्यवरांनी माहिती अधिकार चळवळीचे महत्त्व, नागरिकांचा सहभाग आणि पारदर्शक प्रशासनाची गरज अधोरेखित केली.
पुरस्कार स्वीकृतीनंतर आपली भावना व्यक्त करताना अमोल कोल्हे म्हणाले,
“हा पुरस्कार माझ्या कार्याला अधिक प्रेरणा देणारा ठरेल. या सन्मानामुळे माझ्यावरची जबाबदारी अधिक वाढली आहे. समाजहित, सामाजिक परिवर्तन आणि जनजागृतीसाठी माझा लढा आगामी काळात अधिक जोमाने सुरू राहील.”
कोल्हे यांनी संस्थेचे अध्यक्ष अब्राहम आढाव आणि आयोजक मंडळाचे आभार मानले. अधिवेशनात राज्यभरातील अनेक माहिती अधिकार कार्यकर्त्यांनी सहभाग घेतला. पारदर्शक प्रशासन, भ्रष्टाचारविरोधी मोहिमा आणि नागरिक जनजागृतीबाबत यशस्वी उपक्रमांची मांडणी करण्यात आली.
या अधिवेशनातून माहिती अधिकार चळवळ अधिक प्रभावीपणे राज्यभरात पोहोचवण्याचा संकल्प सर्व कार्यकर्त्यांनी व्यक्त केला.

