ऑक्टोबर महिना ‘सायबर जनजागृती महिना’ — सायबर गुन्ह्यांपासून सावध राहा : उपविभागीय पोलीस अधिकारी विनायक बाजीराव कोते यांचे नागरिकांना आवाहन..
आबिद शेख/अमळनेर

अमळनेर : केंद्रीय गृह मंत्रालयाच्या निर्देशानुसार ऑक्टोबर २०२५ हा महिना संपूर्ण देशभरात ‘सायबर जनजागृती महिना’ म्हणून साजरा करण्यात येत आहे. या उपक्रमाचा उद्देश नागरिकांमध्ये सायबर सुरक्षेबाबत जागरूकता निर्माण करणे असून विविध जनजागृती कार्यक्रम, माहितीपर मोहिमा आणि प्रशिक्षण शिबिरे यांचे आयोजन करण्यात आले आहे.
या अनुषंगाने उपविभागीय पोलीस अधिकारी विनायक बाजीराव कोते (अमळनेर विभाग) यांनी नागरिकांना सायबर गुन्ह्यांपासून सावध राहण्याचे महत्त्वाचे आवाहन केले. त्यांनी सांगितले की, “मोबाईल, इंटरनेट आणि ऑनलाइन व्यवहारांच्या वाढत्या वापरामुळे सायबर गुन्ह्यांमध्ये झपाट्याने वाढ होत आहे. त्यामुळे नागरिकांनी अधिक सतर्क राहणे गरजेचे आहे.”
त्यांनी पुढे सांगितले की, “केंद्रीय गृह मंत्रालयाच्या मार्गदर्शनानुसार सायबर जनजागृतीसाठी ऑडिओ-व्हिडिओ क्लिप्स तयार करण्यात आल्या आहेत. या क्लिप्समधून सायबर फसवणुकीचे प्रकार, फसवणुकीच्या पद्धती आणि बचावाचे उपाय समजावून सांगितले जात आहेत. सर्व नागरिकांनी या माहितीचा लाभ घ्यावा.”
सायबर सुरक्षेसाठी काही महत्वाच्या सूचना देताना त्यांनी नागरिकांना सांगितले —
अनोळखी व्यक्तीकडून आलेले कॉल, लिंक, OTP किंवा लॉटरीचे आमिष दाखवणारे संदेशांपासून सावध राहा.
कोणालाही आपली वैयक्तिक माहिती, बँक खात्याचे तपशील किंवा पासवर्ड देऊ नका.
कोणतीही फसवणूक झाल्यास तात्काळ सायबर हेल्पलाईन क्रमांक 1930 वर संपर्क साधा किंवा www.cybercrime.gov.in या संकेतस्थळावर तक्रार नोंदवा.
“पोलीस प्रशासन आणि नागरिकांनी एकत्रितपणे सायबर सुरक्षेची साखळी मजबूत केली, तर सायबर गुन्हेगारांना थारा मिळणार नाही. प्रत्येक नागरिक सायबर-जागरूक झाला पाहिजे,” असे कोते यांनी अधोरेखित केले.
सायबर जनजागृती उपक्रमांतर्गत पोलिस विभागाच्यावतीने माहितीपत्रके, व्हिडिओ आणि कार्यशाळा आयोजित केल्या जाणार असून नागरिकांनी सक्रिय सहभाग घेऊन स्वतःचे आणि आपल्या परिसरातील नागरिकांचे सायबर गुन्ह्यांपासून संरक्षण करावे, असे आवाहनही कोते यांनी केले आहे.

रवि ज्वेलर्स,अमळनेर,
सोने चांदी आजचे भाव
24 Ct सोने 99.50% : ₹. 129800
22 Ct सोने 91.60% : ₹. 118900
18 Ct सोने 75.00% : ₹. 98600
शुद्ध चांदी 999%:₹. 1870/-
भाव प्रती 10 ग्राम
22 कैरेट 916 हॉलमार्क दागिने मजूरी फ़क्त @ 5%
