मतदार यादीत दुरुस्तीची मागणी — प्रभाग क्र. १८ मधील मतदारांची नावे परत समाविष्ट करा : विनोद लांबोळे

0
New-Doc-10-14-2025-07.28.jpg

आबिद शेख/अमळनेर
अमळनेर नगरपरिषद निवडणुकीसाठी जाहीर झालेल्या प्राथमिक मतदार यादीत अनेक मतदारांची नावे चुकीने इतर प्रभागांमध्ये समाविष्ट झाल्याचे निदर्शनास आले असून, यासंदर्भात दुरुस्तीची मागणी करण्यात आली आहे.

माजी उपनगराध्यक्ष लांबोळे विनोद रामचंद्र यांनी मा. निवडणूक निर्णय अधिकारी तथा उपविभागीय अधिकारी, अमळनेर यांचेकडे लेखी निवेदनाद्वारे ही मागणी केली. त्यांनी नमूद केले की, प्रभाग क्र. १८ मधील चतुसिमेनुसार असलेले अनेक मतदारांचे नावे प्रभाग क्र. १२, १३ आणि १७ मध्ये जोडली गेली आहेत. यामुळे मतदारांचा अधिकार बाधित होत आहे.

या पार्श्वभूमीवर त्यांनी प्रभाग क्र. १८ मधील मूळ मतदारांची नावे संबंधित यादीत परत समाविष्ट करण्याचे आवाहन प्रशासनाला केले आहे. तसेच वगळलेल्या मतदारांची यादी व अनुक्रमांक यासह पुरावेही सादर करण्यात आले आहेत.

लांबोळे यांनी सांगितले की, “प्रभाग क्र. १८ मधील मतदारांचा अधिकार अबाधित ठेवण्यासाठी आणि मतदार यादीत योग्य दुरुस्ती करण्यासाठी प्रशासनाने तातडीने कारवाई करावी.”

कार्यालय : माळी वाडा, बहादरपूर रोड, अमळनेर
📞 मोबा.: ९५६१५५५५७२

रवि ज्वेलर्स,अमळनेर,
सोने चांदी आजचे भाव

24 Ct सोने 99.50% : ₹. 128000

22 Ct सोने 91.60% : ₹. 117200

18 Ct सोने 75.00% : ₹. 97300

शुद्ध चांदी 999%:₹. 1780/-
भाव प्रती 10 ग्राम

22 कैरेट 916 हॉलमार्क दागिने मजूरी फ़क्त @ 5%

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed